भाजप पक्षाचे काम सर्वसामान्य पर्यंत पोहोचवा -जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार

नाझरे (प्रतिनिधी):-राज्यात व देशात भाजपा सरकार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, नितीन गडकरी, देवेंद्रजी फडवणीस यांच्या दूरदर्शी धोरणामुळे रस्त्याची कामे, मान नदीस पाणी आणणे, गरिबांना फुकट रेशन, पी एम किसान योजना, महिलांना एसटी प्रवास व आरोग्य सेवा या सर्व विकास कामात भाजपा पुढे असून, आज पर्यंत केलेली विकास कामे प्रत्येक नागरिकास पोहोचविणे हे कार्यकर्त्यांचे प्रथम काम आहे तरी यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करा, घरोघरी सर्वांच्या विकास कामांची माहिती द्या असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी नाझरे तालुका सांगोला येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर हे होते.
माढा मतदारसंघात आज पर्यंत किती खासदार झाले व त्यांची विकास कामे पहा व आताचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम पहा व त्यामुळे प्रथम दहा खासदारांमध्ये विकास कामात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नंबर लागतो व हे सर्व श्रेय भाजपाचे असून यापुढेही राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार येण्यासाठी आजपासून सर्वांनी कामाला लागा व कोणाला काय अडचण असल्यास कधीही भेटा व रात्री, अपरात्री फोन केल्यास आपण अडचण सोडविण्यास सदैव तत्पर आहोत परंतु उद्याच्या निवडणुकीत रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान ही बाळासो केदार यांनी यावेळी केले. सुरुवातीस विकास कामाची माहिती प्रथम कार्यकर्त्यांनी घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचविणे व यासाठी बूथ अध्यक्ष नेमा असे भाजपा विस्तार प्रमुख हनुमंत करचे यांनी यावेळी सांगितले.
सदर प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष बाबुराव शिंदे, भाजपा पदाधिकारी संजय केदार, दीपक केदार, तानाजी गव्हाणे, रघुदादा लिगाडे, विनोद उबाळे, लक्ष्मण येलपले, पप्पू पाटील, अजित लवटे, समाधान कांबळे, सतीश गुरव, गंगाराम वाघे, अण्णा पाटील, राहुल कोटी, विजय पवार, संजय पाटील, सुरेश रेड्डी, विजय कोटी, संदीप देशपांडे, दादा ननवरे, शंकर पाटील, बापू पाटील, गुरुलिंग पाटील, अरिफ काझी, महेश देशपांडे, चैतन्य देशपांडे, ओंकार चौगुले, भालू भंडारे, संतोष काळे, स्वप्निल पाटील, सुनील कोरे, क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊ पाटील यांनी तर आभार नंदकुमार रायचूरे यांनी मानले.