महादेव नकुल सपाटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
सांगोला शहरातील कोष्टी गल्ली जुन्या सिटी पोस्ट जवळ राहणारे महादेव नकुल सपाटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते त्यांचे शिक्षण एमएबीएड झाले होते कुठेही नोकरी लागली नाही तरी नाराज न होता लहान मोठे क्लासेस घेत होते त्या वेळच्या विद्यार्थ्यांना चांगल्या परिचयाचे होते एकटेपणाचे जीवन जगत असताना त्यांनी कोणाजवळ हात पसरले नाहीत केवळ स्वतःचे कष्ट जिद्द यांच्या जोरावर आपली गुजरान करत होते.
त्यांचा स्वभाव एक गल्ली होता त्यांनी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने सेवा केली पंढरपूर अर्बन बँके जवळील डॉक्टर इंगोले यांचे दवाखान्यात सतरा वर्षे रात्रपाळीने रुग्णांची सेवा केली मंगळवारी सायंकाळी चार साडेचार च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यविधीचा कार्यक्रम वाडेगाव नाक्या येतील स्मशानभूमीत पार पडला.
तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी सात वाजता वाडेगाव नाका येथील स्मशानभूमीत होणार आहे अंत्यविधीच्या वेळी समाजातील नातेवाईक मित्रमंडळी यांचा सहभाग होता दहन दिल्यानंतर त्यांना सर्वांचे वतीने श्री विलास नलावडे गुरुजी यांनी श्रद्धांजली वाहिली