महाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसांगोला तालुका

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सांगोला येथे मतदान जनजागृती फेरी

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून लोकशाहीची ताकद देशातील मतदारावर अवलंबून आहे म्हणून प्रत्येक मतदाराने प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे म्हणून मतदार जागृती महत्वपूर्ण असते मतदाराला जागृत करण्यासाठी शाळेतील शिक्षक अकलाख अहमद शेख ,फारुक भुसारी व श्रीमती.शमीम महेमूद शेख मॅडम फेरीत सहभागी होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या हातात घोषणा फलक घेऊन शाळेच्या वतीने मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो .मामा मावशी काका काकी .मतदान करा नक्की .चला मतदान करूया, देशाची प्रगती घडू या. माझे मतदान, माझे सन्मान .अशा घोषणा देत सांगोल्यात मतदान जनजागृती करण्यात आली. घोषणा देत गावातून फेरी काढली .यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती शमीम महेमूद शेख मॅडम यांनी मतदानाच्या हक्काबद्दल मार्गदर्शन केले .
सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली आणि विद्यार्थ्यांनी नाट्य सादरी करण केले व मतदान करा असा संदेश देत आपल्या आई-बाबांना पत्र लिहिले या मतदान फेरीची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!