सांगोला तालुकामहाराष्ट्र

शासनाने वृद्ध तमाशा कलावंतांना वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला पंचविस हजार द्यावे~ कलावंत बालक कांबळे (पाचेगावकर) 

राज्य शासनाने वृद्ध तमाशा व अन्य लोककलाकारांना मिळणारे मानधन पाच हजार रुपयांवर नेल्याने वृद्ध तमाशा कलावंतांना आधार मिळाला असुन शासनाने वर्षाला वैद्यकीय खर्चासाठी पंचविस हजार मदत द्यावी अशी मागणी ज्येष्ठ तमाशा कलावंत बालक कांबळे (पाचेगावकर)  यांनी केले आहे.
तमाशा कलावंत बालक कांबळे पाचेगावकर २००६ साली अनेक मंत्री महोदय मान्यवर यांच्या प्रशस्तिपत्राने त्यांच्या लोककलेच्या सेवेसाठी गौरविण्यात आले याची दखल घेत स्वर्गीय माजी गणपतराव देशमुख यांचे शिफारस पत्र प्रस्तावा नुसार गेल्या काही वर्षापूर्वी कलावंत पेन्शन सुरू आहे सध्या मानधनात वाढ झाली असल्याने समाधान होत आहे वयोपरत्वे तमाशातील काम कमी असून, शासनाकडून मिळणारे मानधन हेच जगण्याचे साधन बनले आहे.
त्यांनी वयोवृद्ध तमाशा व अन्य लोककलावंतांचे मानधन वाढावे, अशी मागणी गेली काही वर्षे लावून धरली होती. वृद्ध कलाकारांना सध्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अशा व्याधी जडल्या आहेत. त्याच्या औषधाचा खर्च त्यांना करावा लागत आहे. २५ हजारांची मदत मिळावी शासनाकडून यापूर्वी अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. त्यात महिन्याचा घरचा खर्च भागविणेही जिकिरीचे झाले होते. किमान त्यात दुप्पट वाढ झाल्याने जगण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनाने वृद्ध कलावंतांना वैद्यकीय खर्चापोटी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे..
सध्या तमाशाचे काम कमी आहे दुसरं काही काम करता येत नसल्यामुळे पेन्शन वर दिवस काढत आहे पेन्शनमध्ये वाढ झाली आहे आनंदच आहे परंतु वैद्यकीय खर्चासाठी शासनाने वर्षाला किमान पंचविस हजार रुपये दिले तर गोरगरीब कलावंतांना आधार मिळणार आहे शासनाने दखल घ्यावी हीच अपेक्षा…
~ बालक कांबळे पाचेगावकर तमाशा कलावंत
 पाचेगाव बुद्रुक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!