महाराष्ट्रसांगोला तालुका

कोळा परिसरात उन्हाच्या तडाख्यामुळे पशू – पक्षी पाण्याच्या शोधात सैरभैर..

वन विभागाने पाणवठ्यात पाणी सोडावे पशु प्रेमीची मागणी.

उन्हाच्या तीव्रतेत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सांगोला तालुक्यातील कोळा,डोगर पाचेगाव तिप्पेहाळी,किडबिसरी,जुजारपुर,गुणापवाडी,सांगोलकर वस्ती,हंडेवस्ती,बेंदवस्ती डोंगर भागातील पाण्याचे सर्वच स्रोत व पाणवठे कोरडे पडले असुन पशू-पक्षी सैरभैर झालेले चिञ दिसत आहे.
कोळा भागात डोंगर दऱ्या जास्त असल्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाचे मोठे क्षेत्र आहे.त्यात लांडगा,सायाळ,कोल्हा,लांडोर,तरस,तळ्यात रानडुंकर,आदि प्राण्यांचा वावर असतो. मात्र वनीकरण विभागाच्या वतीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली कुठेही दिसत नाही याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.व तातडीने पशु पक्ष्यासाठी पाणी पाणवठ्यात सोडावे अशी मागणी पशु पक्षी प्रेमी यांनी केली आहे.
तळपत्या उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे, उन्हाळ्यामध्ये पक्षी झुडूप किंवा डोगर दरीतील किंवा पाचेगाव घाटातील  सावलीचा आधार घेतात शरीरातील पाणी कमी होत असल्याने उन्हाळ्यात पक्षी फारसे उडतही नाहीत. वन विभागाने पाणवठे कोरडे ठणठणीत असल्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दूषित पाणी आणि उष्माघातामुळे काही पक्ष्यांना जीवही गमवावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी शेकाट्या, टिटवी,कावळे, चिमण्या,मोर,जंगली मांजर,अशा पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे हे पक्षी पाण्याच्या शेजारी असणार्‍या झाडांवर घरटी बांधतात. काही पक्षी पाण्यात पोट ओले करून अंड्यांवर बसतात. त्यामुळे तापमान नियंत्रित राहते. दर अध्र्या तासांनी ही कृती त्यांना करावी लागते.
म्हसोबा डोगर,बानुरगड घाटातील,बिलेवस्ती,मोहिते मळा,जुजारपुर,हटकर मंगेवाडी या  ठिकाणी पाणवठे कोरडे पडले आहेत, तर पाणवठय़ात पाणीच नसल्याने पक्ष्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रसंगी प्राणास मुकावे लागत आहे.कोळे ओढ्याला टेभुचे पाणी बंद झाल्यामुळे  बंदारेत पाणी कमी झाल्याने मासे, कीटक उघडे पडतात. अशा वेळी तलावाभोवती पक्ष्यांची संख्या अधिक असते. याच काळात मासेमारी सोपी होत असल्याने पक्ष्यांच्या शिकारीचा धोकाही असतो. वाढत्या उष्णतेच्या झळांसह अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पशू-पक्ष्यांनाही पाण्यासाठी भ्रमंती करावी लागत आहे.झाड, मंदिरे, घर,बंगला,कोपाट,मळ्यात या परिसरातील मोकळ्या जागा, झाडे, जुन्या इमारती आदी ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे. वन विभागाने तातडीने नविन पाणवठे तयार करून किंवा जे आहे त्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. कोंबडवाडी कोळेकर वस्ती येथील तात्यासो काबुगडे गुरुजी यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये प्लास्टिक कॅनचा वापर करून पक्ष्यांसाठी पाणी व्यवस्था करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!