न्यू इंग्लिश स्कूलच्या वासंतिक वर्गास उत्साहात सुरूवात

सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवी च्या वासंतिक वर्गास मोठ्या दिमाखदार व उत्साही वातावरणात सुरूवात झाली. यावेळी कार्टून व्यक्तिरेखांमधील मोटू व पतलू त्याचप्रमाणे सेल्फी पॅाईंट,बलून पॅाईंट,कॅाप्युंटर लॅब सफर,प्रोजेक्टर द्वारे मनोरंजनात्मक व्हिडीओ या विविध उपक्रमांचा आनंद घेत विद्यार्थांनी पहिला दिवस उत्साहात घालवला. याप्रसंगी विद्यार्थांना खाऊवाटप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थांचा प्रशालेच्या प्रवेशद्वारावर प्राचार्य प्रा.नामदेव कोळेकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात किरण पवार सरांनी विद्यार्थी व पालक यांचे स्वागत करून वासंतिक वर्गाच्या आयोजनाचा हेतू विशद केला. दि.२ मे ते ३१ मे पर्यंत सकाळी ८ ते १० या वेळेत विविध उपक्रमांसहित या वासंतिक वर्गाचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य प्रा.नामदेव कोळेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.यावेळी प्रा.जालिंदर टकले यांनी शेतकरी,कष्टकरी,वंचित व बहुजन विद्यार्थांच्या जडणघडणीत न्यू इंग्लिश स्कूल नेहमी अग्रेसर असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अतिशय जबाबदारीने पार पाडत असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी उपप्राचार्य प्रा.केशव माने पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,दशरथ जाधव,प्रा.संजय शिंगाडे यांच्यासह सर्व शिक्षक-पालक-विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार सर यांनी केले तर आभार प्रा.देवेन लवटे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
वासंतिक वर्गाच्या या उपक्रमास सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॅा.अनिकेत देशमुख,डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर,यांनी शुभेच्छा देवून विद्यार्थांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.