सावे व वाढेगाव गावात श्रीकांत दादा देशमुख यांची कॉर्नर सभा व जनसंवाद दौरा संपन्न

सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा गेल्या महिन्याभरापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावात कॉर्नर सभा व जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे सांगोला तालुक्यातील सावे व वाढेगाव या दोन गावांमध्ये नुकतीच कॉर्नर सभा व जनसंवाद दौरा संपन्न झाला
दोन्ही गावांमध्ये श्रीकांत दादा देशमुख यांचे फटाक्याचे आतशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले या दोन्ही गावात ग्रामस्थांनी कोणतीही अडचण नाही खासदार रणजित सिंह दादा निंबाळकरानी ऐन उन्हाळ्यात जनावराच्या चाऱ्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी फळबागासाठी दुथडी नदी भरून माण नदीत पाणी सोडल्याने समाधान व्यक्त केले तसेच दुष्काळी अनुदानाचा प्रश्नही सरकारने सरकारकडे पाठपुरावा करून मार्गी लावला आमच्या गावाबरोबरच तालुक्यातील प्रत्येक गावाला कोट्यावधी रुपयाचे अनुदानाची यादी जाहीर झाली आहे चुकून राहिलेल्या एखाद्या शेतकऱ्याची दुरुस्ती करून मिळत असल्याने शेतकरी सांगत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये घेणारे सर्वात जास्त लाभार्थी या भागात आहेत या गावात मोफत घरकुल मोफत शौचालय मोफत रेशन मोफत औषध उपचार निराधार व अपंगाचे अनुदान घेणारे लाभार्थी संख्याही मोठी आहे त्यांची उतराई म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ लोकसभा माढासाठी उभा असलेले भाजपा महायुतीचे अधिकृत कमळ चिन्हाचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकरांना निवडून देणार असल्याचे प्रत्येक जण सांगत होते यानंतर मान्यवराची मनोगते झाली त्यानंतर कॉर्नर सभेचे प्रमुख वक्ते श्रीकांत दादांनी मार्गदर्शन केले त्यांनी भाजपा पक्षाची बेइमानी केलेलयांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आव्हान केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माळशिरसच्या विक्रमी सभेने मतदार बंधू भगिनींमध्ये उत्साह संचारला आहे आणि उन्हाळ्यात सावे व वाढेगाव गावासह 16 गावे वाड्या वस्त्यांना जनावराच्या चाऱ्यासाठी फळबागांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी दुथडी भरून माण नदीत पाणी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी प्रयत्न करून सोडल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याप्रमाणे दुष्काळी अनुदानाचा त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केल्याने प्रत्येक गावात कोट्यावधीच्या रकमा एेन उन्हाळ्यात मिळत आहेत अशा कामाच्या खासदार रणजीत सिंह निंबाळकरांना तालुक्यातून प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन केले व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा या भाषणात सविस्तर सांगितला व कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करावे असे सांगितले
सावे येथील कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य तुषार गावडे पप्पू शेळके शंभू माने पांडू पांढरे तानाजी बंडगर सागर शेळके कृष्णा पांढरे महालापा गावडे अर्जुन पाटील सचिन वाघमोडे महादेव शेळके सयाजी माने विजय देवकते बिरा बंडगर प्रवीण कांबळे बाळासो शास्त्री व्यापारी आघाडी माजी सैनिक आघाडी नरेश बाबर इत्यादी उपस्थित होते या कॉर्नर सभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व वाढेगाव येथील कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील दिघे भाजपा भटक्या विमुक्तचे प्रदेश उपाध्यक्ष विजय इंगवले हनुमंत चौगुले प्रकाश भोसले सुरज दिघे राहुल घोंगडे शिवाजी दिघे दीपक दिघे अशोक दिघे सचिन दिघे आबासो भोसले सिद्धेश्वर भोसले मोहनदादा दिघे राजाराम चौगुले हरी ननवरे सिद्धेश्वर दिघे सचिन चौगुले निखिल घोंगडे संदिपान भडकुंबेइत्यादींनी परिश्रम घेतले या कॉर्नर सभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.