रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने पाणपोई सुरू.

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सांगोला शहरातील नागरिकांसाठी पाणपोई सुरू करून तहानलेल्या लोकांची तहान भागवण्याचे काम केले.सांगोला शहरांमध्ये महात्मा फुले चौक, नेहरू चौक व शिवाजी चौक अशा तीन ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली.
यावर्षी उन्हाळा इतका वाढलेला आहे त्या उन्हात थंड जारचे अक्वाचे पाणी लोकांना मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब ने या तीन ठिकाणी पाणपोई दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र दिनापासून सुरू केली.
पाणपोई उद्घाटनासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.साजिकराव पाटील सचिव ॲड.सचिन पाटकुलकर रो. दीपक चोथे रो. हमीदभाई शेख रो. मधुकर कांबळे रो. विकास देशपांडे रो. विलास बीले रो. विजय मेत्रे रो. श्रीपती आदलिंगे रो. डोंबे गुरुजी इत्यादी सभासद उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.