*सांगोला विद्यामंदिरमध्ये १ मे महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न*

सांगोला (प्रतिनिधी) १ मे ६५ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्रसेनानी, देशभक्त गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सेवानिवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी ह.द.माळी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर प्रा. धनाजी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेले हुतात्मे व योगदान दिलेले नागरिक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील प्रगती स्पष्ट कली व महाराष्ट्राला मुक्तेश्वर- ज्ञानेश्वरापासून – विनोबापर्यंत संतांची व त्यामधून समतेची, न्यायाची, बंधू भावाची लाभलेली परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने लाभलेली वीर, पराक्रमांची परंपरा व महात्मा फुले यांच्या रूपाने लाभलेल्या अन्यायाविरुद्ध शोषितांचा कैवार घेणाऱ्या परंपरेची पालखी उद्याचा जबाबदार आणि समंजस नागरिक होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिरवली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील यशासाठी मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र जाधव व अमोल उकळे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, माजी व विद्यमान प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहन निवेदन डी.के.पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पोपट केदार यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधून दि. ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होणारे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार व कलाशिक्षक राजेंद्र जाधव यांचा संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे खजिनदार शंकरराव सावंत, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.व शुभेच्छा दिल्या.