सांगोला तालुका

शहीद जवान भोजलिंग काळेल यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम

सांगोला  ( उत्तम चौगुले):- शहीद जवान भोजलिंग काळेल यांचा सहावा स्मृतिदिन लक्ष्मीनगर दंडाचीवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे पदाधिकारी,माझी सैनिक, वन मंडलाधिकारी , वनरक्षक , गावकरी ,महिला भगिनी, रुबाब खाकीचा करिअर अकॅडमी चे सदस्य, यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
         सदर स्मृतिदिनानिमित्त माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन  रावसाहेब साळुंखे सेना मेडल,  कॅप्टन शिवाजीकाका लवटे, सहसचिव वॉरंट ऑफिसर उत्तम चौगुले, सुभेदार भाऊ निमग्रे, सुभेदार रेवन पाटील, कॅप्टन केशव लेंडवे, मेजर कफने,  मेजर मेटकरी, मेजर शिंगाडे, मेजर भारत मोरे ,कॅप्टन दत्ता केदार  सचिव नरेश बाबर यांचे उपस्थितीत तिरंगा फडकवून सलामी देण्यात आली. शहीद भोजलिंग काळेल अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. फुल पुष्प वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली .
 तसेच प्रवचन कीर्तन सेवा  ह भ प  सुनील महाराज गाडेकर (जालना) यांनी शहीद जवान भोजलिंग काळेल  यांचे विषयी प्रवचनातून देश प्रेमाविषयी असणाऱ्या संकल्पना आणि विचार सोप्या गायन शैलीतून प्रगट केले सदर कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने तसेच गावकरी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रुबाब खाकीचा करिअर अकॅडमीचे मुली आणि मुले स्मृती दिना साठी पुष्प  वाहण्यासाठी हजर राहिले होते.
शहीद भोजलिंग काळेल परिवारातर्फे उपस्थित असणाऱ्या माजी सैनिकांचा आणि नेतेमंडळीचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच रुबाब खाकी वर्दीचा करियर अकॅडमी सदस्यांनी विविध ठिकाणी यश संपादन केले त्याबद्दल त्यांचाही सत्कार शहीद भोजलिंग काळेल परिवारातर्फे करण्यात आला  स्मृतिदिनासाठी वीर माता वीर पत्नी आवर्जून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सांगता उपस्थित असणाऱ्या सर्व गावकऱ्यांना, भजनी मंडळ, माझी सैनिक,मित्र मंडळी यांना भोजन देऊन करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!