फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील स्थापित फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मा. प्राचार्य प्रा. डॉ. संजय किसनराव बैस यांना श्री. भालचंद्र कॉलेज ऑफ फार्मसी हवेली, पुणे येथे आयोजित केलेल्या इंडो – यूएस अंतरराष्ट्रीय परिषद मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. संजय किसानराव बैस यांना ३२ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून तीनशे प्लस शोधनिबंध ,तसेच सात फार्मसी मधील पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. आज पर्यंत त्यांनी पी. एच. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व चौदा विद्यार्थ्यांना एम. फार्मसी मध्ये मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, संस्थेचे एक्झुकेटीव डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.