राजकीयमहाराष्ट्र

माढा लोकसभा; प्रा लक्ष्मण हाके यांची भावनिक पोस्ट

मा नारायण आबा पाटील,मा उत्तमराव जानकर,डॉ बाबासाहेब देशमुख,डॉ अनिकेत देशमुख,मा शिवाजी कांबळे,प्रा शिवाजी बंडगर,डॉ प्रमोद गावडे,मा तुषार वीरकर,मा माणिकराव सोनवलकर,मा सोमनाथ वाघमोडे, मा दादा काळे

आपणास हात जोडून विनंती माढा लोकसभेचा उमेदवार धनगर समाजाचा व्हावा म्हणून तुम्ही सर्वानी एकत्र प्रयत्न करावा . माढा लोकसभेचा लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्या प्रश्नांचा हुंकार म्हणून देशाच्या संसदेत जावा . आपण खासदार माढा लोकसभेचा आपल्या विचारांचा देशाच्या संसदेत पाठवण्यात यशस्वी झालो तर याच माढा लोकसभेत चार पाच आमदार आपले निवडून येतील . आपल्या बरोबर अठरा पगड जातींची लोक बरोबर यायला तयार आहेत . गरज आहे हिम्मत दाखवण्याची . मी लक्ष्मण हाके मागील अनेक वर्षांपासून अठरापगड जाती जमातींच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मला रोज शेकडो कॉल येतायेत तुम्ही निवडणुकीला उभे राहा म्हणून पण वरील नावे घेतलेले स्थानिक ला पब्लिक कनेक्ट असणारे माझे नेते आहेत तुम्ही या सामान्य जनतेच्या मताचा विचार करावा अशी माझी विनंती आहे ……..
राहिला प्रश्न तुमच्या आमदारकीचा जनता तुम्हाला निवडून देणार आहेच पण खासदार आपला होऊ द्या ……..
अभ्यासू,कायदा,संविधान, आपले अधिकार यावर देशाच्या संसदेत थाय थाय नाचणारा अख्या देशाचे लक्ष वेधून घेणारा खासदार संसदेत पाठवू या ,,,,,,,माढा लोकसभेतील जनतेचा आवाज संसदेत पाठवू या….

.
कुठला सिंह आणि कुठला कारखानदार , कुठले संस्था बँका बुडवे यांचं जोखड कशाला माढा लोकसभेतील जनतेच्या माथी मारताय , स्वार्थी विचार सोडून द्या आणि एकदा जनतेसाठी संघर्ष करू या ,लढू या आणि जिंकू या – लक्ष्मण हाके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!