राजकीयमहाराष्ट्र

माढ्याची गंमत-जंमत..

माढा लोकसभा मतदार संघात सुरवातीला भाजपाच्या उमेदवारीला विरोध , उमेदवार बदला,मनधरणी ,बैठका झाल्या. मात्र  गेल्या तीन चार दिवसापासून भाजपने भूमिका बदलत जाहीर उमेदवाराला प्रचार आणि स्थानिक नेत्यांच्या रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे नाराज मोहिते पाटील यांचा मतदार संघात प्रचार सुरु असून त्यांनी भूमिका जाहीर केली नाही . तर माढा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाकडे असल्याने पवार आता केंद्र बिंदू ठरत आहेत. शरद पवार यांच्या भेटीला धर्यशील मोहिते  पाटील, शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख, राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी भेट घेवून उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे.

माढ्यात भाजपा कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली. मात्र त्याला सुरवातीला जेष्ठ नेते विजयसिंह मोहते  पाटील यांचे पुतणे धर्यशील मोहिते  पाटील यांनी विरोध केला. काही दिवसांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला अकलूज येथे गेले. तेथे मोहिते  पाटील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि महाजन यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. या घडामोडी नंतर मोहिते पाटील यांनी मतदार संघातील गाव भेटी सुरु केल्या. यात अनेक ठिकाणी त्यांना पाठिंबा तर अनेक ठिकाणी तुतारी हाती घ्या असा जोर वाढू लागला तसेच जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेवू असा इशारा भाजपला दिला. त्यानंतर मुंबई येथे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते  पाटील, आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.. त्यानंतर भाजपाने मोहिते  पाटील यांना बेदखल केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाच्या उमेदवाराने जोराने प्रचाराला सुरवात केली.

निवडणुकीच्या रणनितीसाठी बैठका सुरु आहेत. नुकतेच माळशिरसचे उत्तम  जानकर यांची नाराजी दूर करून प्रचारात सामील करून घेतले. मात्र दुसरीकडे नाराज मोहिते पाटील हे मतदार संघ पिंजून काढत आहेत. फलटण तालुक्याचे माजी दिवंगत आमदार चिमणरावजी कदम यांचे पुत्र भैय्या कदम यांची भेट मोहिते पाटील यांनी घेतली. आता मोहिते पाटील यांचे समर्थकांनी हाती तुतारी घ्या असा जोर वाढवला आहे. मात्र या घाडमोडी होत असताना दुसरीकडे शरद पवार यांना संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी भेट घेतली  तसेच सांगोल्याचे शेकापचे डॉ अनिकेत देशमुख यांनी पवारांची भेट घेतली. देशमुख हे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहे. ते धनगर समाजाचे असून मतदार संघात जवळपास पाच लाख मतदार धनगर समाजाचे आहेत. तसेच पक्षाचे अभयसिंह जगताप हे देखील इच्छुक असून प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांचा जुना संबध कामी येणार का जातीय समीकरण पाहून उमेदवार देणार हे पाहण औत्सुक्याचे आहे.पवार फॅमिलीतील मनमानीला कंटाळून माहिते-पाटील शरद पवारांपासून लांब झाले.भाजपसोबत गेले.

माढ्यात भाजपचा खासदार निवडून आणण्यात मोहिते पाटील यांचे योगदान आहे,यात शंका नाही.त्याची बक्षिसी म्हणून भाजपने रणजितसिंह मोहिते यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. कुठल्याही पक्षाविरूद्ध बंड करणे साधी सोपी बाब नाही.आजपर्यंत बंड केलेल्यांची आज काय हालत चाललीय हे आपण पहातोय. त्यामुळे मोहिते पाटील स्वतःही त्याचाविचार करत असतील. गेल्यावेळेस खुद शरद पवार हे उभे राहायला धजावत होते.कारण भाजपची तशी लाटच होती.अखेर त्यांनी माघार घेतली.त्याचा विचार करून मोहिते पाटील भाजपच्या विरोधात जायचे का,याचा विचार नक्कीच करत असतील. माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे माढा लोकसभा मतदार संघातील करकंब, जाधववाडी  गावात तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील  हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजयसिंह मोहिते यांचे  लोकसभा मतदार संघातील अनेक गावात  तुतारी वाजवून स्वागत केले जात आहे.

विजय मोहिते पाटील  आज लग्न सोहळ्याच्या निमित्ताने करकंब, जाधववाडी या भागात आले असता त्यांचे तुतारी वाजवून स्वागत केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतरही गेल्या काही वर्षात विजयसिंह मोहिते पाटील राजकारणात सक्रिय नव्हते.  ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील घराणे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एका लग्नसमारंभात एकत्रित आले होते. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले तर त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील वर्चस्व लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या फायद्याचं ठरु शकतं. मात्र भाजपची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश अमावस्येमुळे रखडलाय. धैर्यशील 9 तारखेला शरद पवार गटात प्रवेश करतील तर 15 तारखेला माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरतील, असे बोलले जात आहे. मात्र, शरद पवार गट माढातून धैर्यशील यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, निंबाळकर यांच्यावर सातारचे रामराजे निंबाळकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढा लोकसभेत मोहिते पाटील उमेदवार असतील तर भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!