सांगोला तालुकानिधन वार्ता

*कमलापूर गावचे सदाशिव(बापू) म्हमाणे सर यांचे दुःखद निधन*

कमलापूर गावचे,प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक चळवळीचे संघटक,ज्येष्ठ माजी शिक्षक सदाशिव दिगंबर म्हमाणे यांचे  प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1943 रोजी शेतकरी कुटुंबात झाला.सामाजिक,राजकीय जीवनामध्ये नेहमी सक्रिय क्रियाशील नेते होते.त्यांचे शिक्षण एम.ए बी.एड असे होते.
आपल्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये अनेक पदे उपभोगली आहेत. ते कमलापूर गावचे माजी उपसरपंच होते. तसेच कमलापूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन होते. शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. जवाहर विद्यालय घेरडी व सोनंद हायस्कूल सोनंद या शिक्षण संकुलाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. कमलापूर पंचक्रोशीत नेहमीच त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सामाजिक,राजकीय व आर्थिक क्षेत्रांमध्ये कधी न भरून निघणारे नुकसान सरांच्या मृत्यूमुळे झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मोठा मुलगा सोनंद हायस्कूल सोनंदचे मुख्याध्यापक दत्तात्रय सदाशिव म्हमाणे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव बसवेश्वर उर्फ पिंटू सदाशिव म्हमाणे, उच्चशिक्षित तीन विवाहित मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे, मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्षाचे होते. त्यांचा तिसरा दिवस उदय दिनांक 8/ 4/ 2024 रोजी 8:30 वाजता कमलापूर येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!