इनरव्हील क्लब सांगोला चैतन्य हास्य क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान

सांगोला (प्रतिनिधी):- इनरव्हील क्लब व चैतन्य हास्य क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने उपयुक्त असा ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान ठेवण्यात आले,
चौंडेश्वरी मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला उपयुक्त असं डॉ मकरंद येलपले व भूलतज्ञ डॉ शितल येलपले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले ते म्हणाले वयाच्या साठ पूर्ण झालेल्या नागरिकांना आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधलं जातं अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेदुखी कंबर दुखी थायरॉईड साखर रक्तदाब बीपी असे विविध प्रकारचे विकार सतवत असतात त्यावर उपाय म्हणून सात्विक आहार नियमित व्यायाम मित्रांचा सहवास आदर्श जीवनशैली योग्य औषधोपचार केल्यास ज्येष्ठ नागरिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात व ज्येष्ठ पुरुष व महिला यांच्या प्रश्नाचे निवारण केले डॉ शीतल येलपले भूल व मुलीचे प्रकार या विषयावर मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी चैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष जगताप सर चौंडेश्वरी योगा ग्रुपच्या सौ मंगल लाटणे व कृष्णा इंगोले सर झिरपे सर सुधीर दौंडे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या सदस्या अरुणा घोंगडे विजया खरतडे स्वाती ठोंबरे एडिटर संगीता चौगुले अंकिता आणेकर वंदना महिमकर मॅडम मंगल कांबळे ज्योती दौंडे मंगल कुलकर्णी योगा ग्रुपचे सदस्य व चैतन्य हास्य क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णा इंगोले सरांनी श्री व सौ डॉक्टर येलपले यांचे आभार मानले