सांगोला तालुका

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

सांगोला येथील असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये  मंगळवार दिनांक 09/04/2024 चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा ते  दिनांक 17/04/2024 चैत्र शुद्ध नवमी  चे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये  पहाटे 5.30 वाजता  मंगलध्वनी, काकड आरती पूजा, सकाळी 6.30 वाजता नाम साधना मंडळ(पुरुष व महिला) यांचा जप, सकाळी 8 वाजता प्रभू श्रीरामाचा अभिषेक, दुपारी 3 ते 4 अध्यात्म रामायण(पोथी), सायंकाळी4 ते 5.30  महिला मंडळाचे भजन तसेच सायंकाळी 7 ते 8-30  प्रवचन व गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर उत्सव काळात श्रीराम महिला भजनी मंडळ सांगोला, श्री समर्थ महिला भजनी मंडळ सांगोला, श्री यमाई महिला भजनी मंडळ सांगोला, श्री जय भवानी महिला भजनी मंडळ सांगोला, श्रीदत्त महिला भजनी मंडळ सांगोला, श्री विठ्ठल महिला भजनी मंडळ सांगोला, आसावरी महिला भजनी मंडळ मंगळवेढा, श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ पंढरपूर, बसवेश्वर, महिला भजनी मंडळ शिवपार्वती महिला भजनी मंडळ, रुद्र महिला भजनी मंडळ, गुरुमाऊली  महिला भजनी मंडळ, सई महिला भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ यांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत, गुढीपाडव्या दिवशी रात्री 9 वाजता  स्थानिक पुरुषांचे भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे तसेच  गुरुवारदिनांक 11/ 4/2024  रोजी सायंकाळी ह भ प  चारुदत्त देशपांडे यांचे प्रवचन तसेच  शुक्रवार दिनांक12.04.2024  गीत रामायण कार्यक्रम, शनिवार दिनांक 13.04.2024, ह भ प प्रा. तुकाराम मस्के यांचे प्रवचन, रविवार  दिनांक 14.04.2024  श्रीराम महिला भजनी मंडळ, अथर्वशीर्ष महिला भजनी मंडळ व इतर महिला मंडळ यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवार दिनांक 15.04.2024, रोजी ह भ प मनोज शहा यांचे प्रवचन आयोजित केलेले आहे.  सर्व कार्यक्रम श्रीराम मंदिर महादेव गल्ली सांगोला येथे होतील.

बुधवार दिनांक 17/ 4/2024  रोजी सकाळी 10ते 12 श्रीराम जन्मोत्सवानिमित्त  ह भ प शुभांगी कवठेकर यांचे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन व  पुष्पवृष्टी  होईल त्यानंतर सायंकाळी 5 ते 8 श्रीरामाची पालखीची भव्य शोभायात्रा सांगोला शहरातून निघणार आहे. गुरुवार दिनांक 18.04.2024  रोजी दुपारी 12 ते 2  या वेळेत  महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी या भक्तिमय व आनंददायी    श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात भावी भक्तांनी  सहभागी व्हावे असे आवाहन एडवोकेट सारंग वांगीकर, नाम साधना मंडळ(महिला व पुरुष) श्रीराम महिला भजनी मंडळ सांगोला यांनी केलेले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!