सांगोला ( प्रतिनिधी) गुरुवर्य स्व.जगूअण्णा ऊर्फ.मधुसुदन पंढरीनाथ ठोंबरे गुरूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुंजकरवाडी तालुका सांगोला येथे ठोंबरे परिवार व सांगोला लायन्स क्लब यांचेकडून शैक्षणिक साहित्य म्युझिक सिस्टम भेट व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर लायन्स प्रांत ३२३४ड१ माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, राजमाने सर, विजय इंगोले ,लायन्स कॅबिनेट ऑफिसर प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती व गुरुवर्य स्वर्गीय जगूअण्णा ठोंबरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर ठोंबरे परिवाराकडून शैक्षणिक साहित्य म्युझिक सिस्टीम व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी या शाळेची स्थापना करण्यामागे स्व.जगूअण्णा उर्फ मधुसुधन ठोंबरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच त्यांनी त्या काळात शाळा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आज या परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे सांगत त्याकाळच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठोंबरे परिवाराने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी ठोंबरे परिवारातील सर्व सदस्य, लायन्स क्लब सदस्य,रोटरी क्लबचे सदस्य, रिटायर ग्रुपचे सदस्य, बुंजकरवाडी परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुंजकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका गवसने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता शिंदे- गायकवाड मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन बुंजकर यांनी केले.