सांगोला तालुका

वाढेगांव येथे अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ

वाढेगांव – वाढेगांव ता. सांगोला येथे गुढीपाडव्यापासून  सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आल्याची माहिती पारायण समितीच्यावतीने देण्यात आली.
दररोज पहाटे ५ ते ६.३० काकड आरती, सकाळी ७.३० ते ११.३० वा. ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ वा. भोजन त्यानंतर दुपारी २ ते ३ गाथा भजन, सायंकाळी ४.३० ते ६ वा. हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ वा. किर्तन, गांवभोजन व त्यानंतर हरिजागर असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम असून हा सप्ताह दि. १५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचे व्यासपीठ व मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी साळुंखे महाराज व ह.भ.प. डॉ. विजयकुमार जाधव (सर) म्हणून काम पाहणार आहेत.
रविवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत नगरप्रदीक्षणा होणार आहे. तसेच सोमवार दि. १५ रोजी सकाळी १० वा. काल्याचे किर्तन व महाप्रसादाने या सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पारायण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!