सांगोला तालुका

डॉ.अभिजीत सावंत जवळे गावाला चांगली वैद्यकीय सेवा देतील -दीपक आबा

जवळे येथे श्री.दत्त हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन संपन्न.

जवळे(प्रशांत चव्हाण) डॉ.संजीव कुलकर्णी यांच्या आकस्मित निधनानंतर जवळे गावामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अतिशय मोठी पोकळी निर्माण झाली होती.कुणालाही माहित पडतोपर्यंत  अस्वस्थ झाले. डॉ.संजीव कुलकर्णी यांच्या अचानक जाण्याने सगळं गाव हळहळ डॉ.संजीव कुलकर्णी माझ्या कुटुंबातील आक्कांचे डॉक्टर होते. अक्काला काय जरी वाटलं तरी अक्का म्हणायच्या डॉ.संजीव कुलकर्णींना बोलवा म्हणायच्या डॉक्टर संजीव कुलकर्णी नुसतं येऊन बसले तरी अक्का बरं व्हायच्या डॉक्टर संजीव कुलकर्णी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे डॉक्टर होते. असे प्रतिपादन डॉ.अभिजीत सावंत(बनाळीकर) यांनी मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कै. डॉ.संजीव कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू केलेल्या श्री.दत्त हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना दीपक आबा म्हणाले डॉ.अभिजीत सावंत यांना सांगेन डॉक्टरांचा पेशा असा आहे की तुमच्या औषध उपचारा पेक्षा त्यांच्याशी तुम्ही कसं बोलताय त्याच्यामध्ये पेशंट अर्धा बरा होऊ शकतो डॉक्टर संजीव कुलकर्णी यांच्या दवाखान्यात तुम्ही वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.कुलकर्णी डॉक्टरांचा दवाखाना पुन्हा सुरू झाला मला खूप बरं वाटलं. डॉक्टर अभिजीत सावंत यांच्याकडून आमच्या जवळे गावाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो असे सांगून डॉक्टर सावंत यांनी सुरू केलेल्या वैद्यकीय व्यवसायाला दीपक आबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दीपक आबांचा सत्कार सावंत परिवाराच्या वतीने करण्यात आला.सदरप्रसंगी जवळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अरुणभाऊ घुले सरकार,श्री डी वाय कुलकर्णी,श्री.श्रीकांत भोसले,श्री.प्रमोद साळुंखे(उद्योजक)श्री.अनिल साळुंखे(चेअरमन)श्रीमती सुनंदा कुलकर्णी मॅडम,सौ.सीता सुरवसे,श्री.शंकर पितांबरे (गुरुजी) श्री.दत्तात्रय सावंत(गुरुजी) श्री.प्रभाकर कोडग,श्री.बाळासाहेब कुलकर्णी(गुरुजी) श्री.सचिन पवार(युवा उद्योजक) श्री.तुकाराम सावंत,श्री.वैभव गायकवाड यांच्यासह जवळे गावातील तरुण वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!