आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिवणे विद्यालयाची मोनिका जाधव गुणवत्ता यादीत

शिवणे(वार्ताहर)-परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्वमध्यमिक शिष्यवृत्ती ( इयत्ताआठवी स्कॉलरशिप)परीक्षेत शिवणे माध्यमिक विद्यालयाची कु.मोनिका बाळासाहेब जाधव हिने 188 गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.त्याबद्दल विद्यालयातर्फे तिचा पालकासमवेत फेटा बांधून व पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला.
विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की,मोनिकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून हे यश मिळविले आहे तिच्याकडून सर्व मुलांनी प्रेरणा घेऊन विविध स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन यश खेचून आणले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत नरळे यांनी केले.