शैक्षणिकमहाराष्ट्रसांगोला तालुका

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत विद्यामंदिर परिवार जिल्ह्यात अव्वल*

सांगोला (वार्ताहर)- केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती देणारी एन.एम.एम.एस.ही परीक्षा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी 24 डिसेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. नुकतीच या परीक्षेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला, नाझरा विद्यामंदिर प्रशाला, नाझरा आणि कोळा विद्यामंदिर हायस्कूल, कोळा या शाखांमधील एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीत 68 तर सारथी शिष्यवृत्तीत 60 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेत आपला दबदबा कायम राखला आहे.

सदर परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एकूण 190 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 164 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीसाठी 49 तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 45 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षात तब्बल 46 लाख 68 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस.विभाग प्रमुख प्रदीप धुकटे यांच्यासह मंगेश म्हमाणे, सुनील भोरे, नरेंद्र होनराव, राजेंद्र ढोले, अमोल महिमकर, सिताराम राऊत, निलेश जंगम, विनीत चिकमने, शिवानंद लोखंडे, मनीषा मिश्रा, शितल कांबळे, भाग्यश्री मिरजे, रोहिणी शिंदे, प्रियांका कोरे, कविता राठोड, बाह्यपरीक्षा विभागप्रमुख वैभव कोठावळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

 

नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे एकूण 65 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीसाठी 10 तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 15 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षात तब्बल 11 लाख 76 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस.विभाग प्रमुख मारुती सरगर यांच्यासह सोमनाथ सपाटे, दिपाली काशीद, मंजुश्री ओतारी, बाह्यपरीक्षा विभागप्रमुख वसंत गोडसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे एकूण 59 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीसाठी 9 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षात तब्बल 5 लाख 40 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस.विभाग प्रमुख सुखदेव कोळेकर यांच्यासह निलेश कांबळे, शुभांगी नागरसे, गुरुदेव उजनीकर, सोमनाथ कांबळे, बाह्यपरीक्षा विभागप्रमुख प्रसादसिंह आदाटे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी भरीव आर्थिक सहकार्य प्राप्त होत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये या परीक्षेचे महत्त्व जास्त आहे.
संस्थेच्या सांगोला, नाझरा व कोळा या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे सर, खजिनदार शं.बा.सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, सर्व संस्थासदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, अमोल गायकवाड, श्रीकांत लांडगे, उपप्राचार्या शाहिदा सय्यद, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, बिभीषण माने, अजय बारबोले, पोपट केदार, रफिक मणेरी, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

 

यावेळी संस्थेच्या तीनही शाखांमध्ये संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करत शिक्षकांना पेढे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजीत यशाचा सोहळा साजरा करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित सन्मान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!