सांगोला तालुका

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन
मतदान करणाऱ्या विद्यार्थांचा कॉलेजमध्ये होणार सन्मान

सोलापूर दि. 14 (जिमाका) :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन ७ मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीने बहाल केलेला मतदानाचा आपला अधिकार मतदान करून बजावतील अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये पुष्प व सन्मानपत्र देऊन कौतुक केले जाणार आहे.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा दुहेरी उद्देश साध्य व्हावा या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वतीने एक परिपत्रक काढले असून मतदान करणाऱ्या विद्यार्थांचा महाविद्यालयामध्ये पुष्प व सन्मानपत्र देऊन प्रोत्साहीत करावे अश्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात असलेला विद्यार्थी मतदार वर्ग या निवडणुकीच्या उत्साहात सहभागी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान करणार आहेत. आणि साहजिकच या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसणार आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 हा लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या उत्साहात सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी , भारत निवडणूक आयोगाचे स्वीप नोडल ऑफिसर डॉ. सुधीर ठोंबरे, निवडणूक साक्षरता मंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असुन या सर्वांच्या प्रयत्नाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. प्रकाश महानवर , कुलसचिव डॉ. योगिनी घारे , एन एस एस विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वडजे या मान्यवरानी सुद्धा साथ दिली आहे.
आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असणार आहेत , आणि देशाचे उद्याचे भविष्य असणारे हे विदयार्थी जेवढे जागरूक असतील तेवढा देशाचा विकास उत्तम होतांना दिसणार आहे. तेंव्हा या निवडणुकीत मतदान करून जागरूक नागरिकांची महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देणे हे क्रमपाप्त आहे. आणि ते कार्य जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांनी मोठ्या उत्साहाने करावें असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व एन एस एस विभाग – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , स्वीप , निवडणूक साक्षरता मंडळ सोलापूर जिल्हा , वर्शीप अर्थ फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

000000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!