क्राईम

शिरभावी येथे आढळली कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली 28 गोवंश जातीचे वासरे

सांगोला(प्रतिनिधी):- कत्तलीच्या उद्देशाने 14 हजार रुपये किंमतीचे 28 गोवंश जातीचे वासरांना डांबुन ठेवलेल्या अवस्थेत शिरभावी ता.सांगोला येथे मिळुन आली. फिर्याद पोकों रमेश कांबळे (सांगोला पोलीस ठाणे ) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरभावी ता. सांगोला येथे छोट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त गोवंश जातीचे वासरांना दाटीवाटीने कोडुंन त्यांना वेदना होईल अशा परस्थितीत कमी रुंदीच्या जागेत हालचाल करता येणार नाही. तसेच त्यांच्या चारा पाण्याची कुठल्या ही प्रकाराची व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा पध्दतीने कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या अवस्थेत मिळुन आली आहेत. तसेच काही वासरे हे जमीनवर निपचीप पडलेल्या अवस्थेत दिसुन आले.

 

म्हणुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि. 1995 चे कलम 5 (अ) 5 (ब) 9 (ब) 11 सह. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!