शैक्षणिक

हलदहिवडी विद्यालय व जुनिअर कॉलेज हलदहिवडी चे N.M.M.Sपरीक्षेमध्ये घवघवीत यश……

शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (N.M.M.S) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेले एकूण सहा विद्यार्थी आहेत.

 

यामध्ये येडगे समर्थ, ताटे सुप्रिया ,बागल पवनराज, बोत्रे प्रांजली, चंदनशिवे ऋतुजा, भजनाळे स्वरांजली यांना अनुक्रमे  प्रतिवर्षी 12000 प्रमाणे पाच वर्षाचे3,60,000 मंजूर झाले तसेच, सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले सहा विद्यार्थी आहेत .यामध्ये लेंडवे मयुरी, भोसले वैष्णवी, केचे तनिष्का, इंगोले मुक्ता, लेंडवे वैभवी, ताटे अर्चना यांना अनुक्रमे प्रतिवर्षी 9,600 प्रमाणे चार वर्षाचे 2,30,400 रुपये मंजूर झाले तसेच मदने करण ,अर्जुन शितल, मोरे  वैष्णवी, मदने  ईश्वरी, फाळके अभिराज, हांडे वैष्णवी , कुंभार अक्षरा , मेटकरी क्षितिजा, होवाळ  जाई, होवाळ साहिल यांनी  ( N.M.M.S) परीक्षेत यश मिळवले त्यांच्या यशामध्ये हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सहशिक्षक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक श्री प्रकाश गळवे सर यांनी अथक परिश्रम घेतले. सततचा सराव अभ्यासक्रमाचे नियोजन सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच  हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे नाव शिवणे केंद्रात उल्लेखनीय झाले आहे.

 

या यशाबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  श्री रमेश येडगे (वकील )साहेब तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री विश्वनाथ (नाना) चव्हाण ,प्राध्यापिका सौ अपर्णा जानकर (येडगे )मॅडम यांनी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले मुलांच्या या यशामुळे हलदहिवडी ग्रामस्थांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!