पै. सचिन हजारे “राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज क्रीडा रत्न” पुरस्काराने सन्मानित…

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांचेकडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर मधील शिवाजी चौक येथे 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संपन्न झाला.
क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे क्रीडाशिक्षक पै. सचिन हजारे सर यांना यावर्षीचा राजर्षी शाहू महाराज क्रीडा रत्न पुरस्कार माजी खासदार अमरसिंह साबळे व माजी मंत्री श्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक दिराज सर्वगोड, स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बी पी रोंगे सर, पश्चिम महाराष्ट्राचे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे,भाई नितीन काळे, मोहोळ चे शेतकऱ्यांचे नेते श्री प्रभाकर भैय्या देशमुख, प्रा. रोहित पिंजारी पाटील, प्रा. अरुण बेहेरे, प्रा. कामाजी नायकुडे, प्रा देवेन लवटे,श्री अंकुश बंडगर व शिवाजी वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.