सांगोला तालुकाराजकीय

बाबा करांडे यांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षाची अपिमित हानी – आ.जयंत पाटील

सांगोला(प्रतिनिधी):-सोलापूर जिल्ह्यात कै. बाबा करांडे यांचे सर्वच राजकीय पक्षामध्ये जिव्हाळयाचे व आपुलकीचे संबंध होते. स्पष्ट, परखड व अभ्यासपूर्ण विचारसरणीमुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराचे, सन्मानाचे स्थान होते. त्यांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षाची अपिमित हानी झाली आहे. कै. बाबा करांडे यांच्या नेतृत्वाच्या पोकळीची उणिव भरून निघणे अत्यंत कठीण आहे असा शोक शे.का.पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

डॉ.भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीचे संचालक कै. बाबा करांडे यांचे दिनांक 13/04/2024 रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. नुकतीच शोक सभा संपन्न झाली. यावेळी भाई.आ.जयंत पाटील बोलत होते.

 

यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, या विविध पदांवर काम करीत असताना शेतकरी कामगार पक्षावरील त्यांची निष्ठा, पक्षाची ध्येय/धोरणे यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड त्यांनी केली नाही. शासनाच्या योजना/सवलती याचा लाभ सर्वसामान्य, गरीब, मागासवर्गीय, दुर्बल घटकांना मिळावा यासाठी स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेले कार्य सांगोले तालुक्यातील जनतेसाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगत श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी डॉ.अनिकेत देशमुख, तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, डॉ.प्रभाकर माळी, विठ्ठलराव शिंदे, अ‍ॅड्.भारत बनकर, अ‍ॅड. मारूती ढाळे, अ‍ॅड. सचिन देशमुख, संतोष देवकते यांनी श्रध्दांजली अपर्ण केली. यावेळी मारूतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, गिरीष गंगथडे, समाधान पाटील, रमेश जाधव, अ‍ॅड्. नितीन गव्हाणे, अ‍ॅड.विशालदिप बाबर, श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, उषाताई देशमुख, अ‍ॅड. संजय मेटकरी, रामभाऊ लवटे, आप्पासाो इंगोले, बबनराव जानकर, मोहन गेळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सूत गिरणीचे कामगार/कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!