न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅालेज प्राचार्य पदी प्रा.केशव माने यांची निवड

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅालेज प्राचार्य पदी प्रा.केशव माने यांची निवड झाली. यावेळी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांनी १ सप्टेंबर १९९३ रोजी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.सेवाजेष्ठतेनुसार त्यांनी उपप्राचार्य म्हणून उत्तम सेवा बजावली व त्यानंतर पदोन्नतीवर प्राचार्य म्हणून निवड झाली.
नूतन प्राचार्य प्रा.केशव माने यांनी मावळते प्राचार्य प्रा.नामदेव कोळेकर यांच्या हस्ते पदभार घेतला. यावेळी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थासंचालक प्रा.दिपकराव खटकाळे ,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,पर्यवेक्षक दशरथ जाधव,पर्यवेक्षक प्रा.संजय शिंगाडे,प्रा.जालिंदर टकले,प्रा.अमोल केदार,अनिल खरात सर,जेष्ठ लिपिक मारुती अंकुशी,लिपिक अनिल लाटणे,लिपीक आण्णासो जानकर ,विश्वास गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,उपाध्यक्ष रामचंद्र खटकाळे,सचिव विठ्ठलराव शिंदे, संस्था सदस्य बबनराव जानकर,डॅा.अशोकराव शिंदे,प्रा.दिपकराव खटकाळे,प्रा.जयंतराव जानकर,अवधूत कुमठेकर यांनी नूतन प्राचार्य प्रा.केशव माने यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.