जवळे येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव जवळे येथील श्री. नारायणदेव मंदिर येथे मोठ्या उत्साही वातावरणात बुधवार दि. 17 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
सदरप्रसंगी ह भ प कै. शारदादेवी काकी साळुंखे-पाटील यांच्या कृपाशीर्वादाने श्री. नारायणदेव महिला व पुरुष भजनी मंडळ जवळे यांनी अतिशय उत्साही वातावरणात बहारदार असा भजनाचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर ठीक 12 वा. प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी व महिलांनी प्रभू श्रीरामाचा पाळणा सादर केला.या कार्यक्रमात भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन जवळे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.रूपमतीदेवी साळुंखे-पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.
सदरप्रसंगी श्री.साहेबरावदादा पाटील,श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.चंद्रकांत सुतार,श्री.रमेश आप्पा साळुंखे,श्री.विलास घुले सर,श्री.आनंदा वाघमारे,श्री.नामदेव सुरवसे,श्री.राजू सरवदे गुरुजी,श्री.सुहास कुलकर्णी गुरुजी,श्री.दीपक चव्हाण,श्री.शिंत्रे गुरुजी,श्री.सदाशिव साळुंखे यांच्यासह महिला,पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी परिश्रम घेतले.