फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत निर्मल वारी उपक्रम संपन्न

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत निर्मल वारी उपक्रम संपन्न झाला.या निर्मल वारी उपक्रमाच्या माध्यमातून चैत्री वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांना अल्पोपहाराचे वाटप प्राचार्य डॉ.आर.बी.शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटोळे व समन्वयक प्रा. कुबेर ढोपे यांनी केले .
निर्मल वारी उपक्रम च्या माध्यमातून स्वय्यंसेवकांनी वारकऱ्याशी संवाद साधला व त्यांना व्यसनमुक्ती , स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. भर उन्हात पायी दिंडीत सहभागी झालेल्या अबाल तसेच वृद्ध वारकऱ्यांचे स्वयंसेवकानी कौतुकं केले.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे,आय.क़्यु.ए.सी.चे समन्वयक प्रा.शरद आदलिंगे , श्री.राजेंद्र पाटील , श्री.राजेश जाधव यांच्या उपस्थित संपन्न झाला.