सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

५५ वर्षातील सिंचनाचा बॅकलॉग पाच वर्षात भरून काढला – आमदार शहाजीबापू पाटील ; पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य

 

सांगोला (प्रतिनिधी): गेल्या पाच वर्षांत सांगोला विधानसभा मतदारसंघाचा खुंटलेला विकास मार्गी लावला असून शाश्वत विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून विकासकामे सुरू आहेत. विकासाचा तसेच सिंचनाचा बॅकलॉग भरून काढत असताना सर्वसामान्य शेतकरी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न सोडवून हरितक्रांतीला चालना दिली आहे. रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी खा.रणजितसिंह निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून गेल्या ५५ वर्षातील सिंचनाचा बॅकलॉग पाच वर्षात भरून काढला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

गेल्या ५५ वर्षात सांगोला विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या आशेने मला विधानसभेत पाठवल्याने मी गेल्या पाच वर्षात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या सिंचन प्रकल्पांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय आहे. मतदारसंघात रस्ते, पाणी प्रश्न, वीज पुरवठा यासह अनेक विकासकामे हाती घेतली आहेत तर अनेक कामे पूर्ण केली आहे. इग्रजांच्या काळात बांधलेल्या शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाला निधी उपलब्ध करून नूतनीकरणासह सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.

सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेली मात्र, जवळपास १७ वर्षापासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला. बहुप्रतिक्षित सादर योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना नामकरण करून तब्बल ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या योजनेमुळे सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठीच कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सर्वसामान्य शेतकरी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न सोडवून हरितक्रांतीला चालना दिली. सांगोला शहरातील ईदगाह मैदानासह मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तसेच इतर विकास कामे मार्गे लावण्यासाठी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!