सांगोला तालुकाराजकीय

भव्य अश्या मिरवणुकीने मोठ्या उत्साहात मा.आम दीपकआबांच्या शुभहस्ते पाणी पूजन संपन्न; जुनोनी पाझर तलाव १००% टक्के भरल्याने परासरी परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह

सांगोला/ प्रतिनिधी:: यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी मोठा संकटात सापडला होता.कोळा जूनोनी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे जुनोनी पाझर तलाव १००% भरून दिल्याने  परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात,फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणुकीने स्वागत करीत कार्यसम्राट, पाणीदार नेते मा.आमदार दीपकआबा साळुंखे -पाटील यांच्या शुभहस्ते पाण्याचे पूजन केले यावेळी सर्वपक्षीय नेते,शेतकरी यांचा शुभहस्ते दीपकआबांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे – पाटील म्हणाले चालू वर्षी पाऊसकाळ अत्यंत अल्प असल्याने   कोळा  परिसरातील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून जुनोनी पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे हा तलाव भरून देण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे टेंभू योजनेचे पाणी बहुतांशी भागाला पोहवविण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागाला देखील पाणी मिळणार आहे .याशिवाय म्हैसाळ योजनेचे उचल पाणी तालुक्यातील सोनंद, गळवेवाडी,जवळा, बूरंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी परिसरात पोहचले असून लवकरच वाढेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल. टेंभू योजनेवर आधारित असणाऱ्या माण नदीकाठच्या गावांना देखील येत्या २५ किंवा २६ सप्टेंबर रोजी या योजनेचे पाणी आटपाडी तलावातून पाणी सोडले जाईल.त्यामुळे  माण नदीकाठावरील खवासपूर लोटेवाडी कमलापूर अकोला,बलवडी, नाझरे, चीनके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर,अकोला, कडलास, वाढेगांव,मांजरी,देवळे,मेथवडे पर्यंत असणारे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून दिले जातील याबाबत कोणी चिंता बाळगू नये. तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या म्हैसाळ,टेंभू, नीरा उजवा कालवा या सर्व योजनांचे पाणी मिळविण्यासाठी नियोजन झाले असल्याचे देखील यावेळी बोलताना दीपकआबा सांगितले
दिलेला शब्द पाळणारे पाणीदार नेते दीपकआबा 
कोळा जुनोनी परिसरातील शेतकऱ्यांची जुनोनी पाझर तलाव भरून देण्याची मागणी पूर्ण झाल्याने.परिसरातील महिला, शेतकरी व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आबांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिलेला शब्द पाळणारा पाणीदार नेता असा अबंचा उल्लेख करीत त्यांचे अभिनंदन केले.दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर परिसराला पाणी मिळाल्याचे समाधान  दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!