माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. नाईक निंबाळकर यांना सांगोला शहरातून 4 हजार मतांचे लीड मिळणार: माजी लोकनियूक्त नगराध्यक्षा राणीताई माने
सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर) : माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सांगोला शहरातून 4 हजार मतांचे लीड मिळणार .हे लीड देण्यासाठी भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना, मनसे, या पक्ष्यांच्या नेते मंडळींचा सिंहाचा वाटा असणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील ,माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील ,भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,नेतेमंडळी यांचे योगदान लाख मोलाचे ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात , राज्यात व तालुक्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी भरघोस असा निधी दिला. आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वारंवार विविध विकास कामांची केलेली मागणी व विकास कामासाठी प्राप्त केलेल्या निधी यातून सांगोला शहर व तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागली.आमदार शहाजीबापू पाटील यांनी 16 मार्च 2021 ते 11 मार्च 2024 या तीन वर्षाच्या काळात सांगोला नगरपालिका हद्दीतील शहर व उपनगरासाठी विविध विकास कामासाठी एकूण 173 कोटी 76 लाख 87 हजार 265 रुपयाचा निधी मंजूर केला असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत, उर्वरित अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील. आमदार शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने सांगोला शहरात विविध विकास कामांना सरकारच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली विराट सभा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात झालेली भव्य सभा याचा अनुकूल परिणाम मतदारांच्या मनावरती झाला असून सांगोला शहरातून माजी नगराध्यक्ष राणीताई माने, माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांनी, महायुतीच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सांगोला शहरात केलेला होम टू होम प्रचार व प्रचार ,पत्रकाच्या माध्यमातून तालुक्यात झालेली विकास कामे शहरातील नागरिकापर्यंत पोहोचविली.मतदारांमध्ये महायुतीविषयी मत परिवर्तन करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार बनवण्यासाठी व देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शहरात होम टू होम प्रचार केला. सांगोला शहरातून खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे 4 हजार मताधिक्याने विजय होतील असा ठाम विश्वास, महायुतीच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राणीताई माने यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न ,जनावराच्या पाण्याचा प्रश्न,प्रश्न मार्गी लावण्यात या नेतेमंडळींना मोठे यश आले आहे .शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. नजीकच्या काळात सांगोला तालुक्यातील सर्व गावांमध्ये शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे भविष्यात हरितक्रांती घडणार आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी गत निवडणुकीत सांगोला तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावूनच पुढच्या निवडणुकीस सामोरे जाईन असा शब्द सांगोला तालुक्यातील जनतेला दिला होता तो त्यांनी शंभर टक्के पूर्ण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये अनेक विकासाच्या योजनेच्या माध्यमातून जनतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच राज्य शासनाने शेतीसाठी वार्षिक 6 हजार रुपये देणे चालू केले आहे .उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, एसटी बस प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केला आहे. तसेच गोरगरिबांना रेशनच्या माध्यमातून महिना 5 किलो धान्य मोफत देण्यात येत आहे. याचा लाभ 80 कोटी नागरिकांना होत आहे. तसेच रस्ते ,पाणी ,वीज उद्योगधंदे ,शिक्षण या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निधी देऊन विकासाच्या अनेक योजना , मार्गी लावल्या आहेत. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सांगोल्यासाठी शेतीच्या पाण्यासह अनेक योजना मार्गी लावल्या .
टेंभू योजनेतून माण नदीस उन्हाळ्यात निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. तालुक्याच्या इतर भागातही म्हैसाळ, टेंभू इतर अनेक योजनेचे पाणी तालुक्यातील नद्यात सोडून बंधारे भरून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी तालुक्यात आणला आहे. त्यातून अनेक कामे मार्गी लागली असून भविष्यात ही अनेकामे मार्गी लागणार आहेत.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत सांगोला शहरातून 4 हजार मताधिक्याने विजयी होतील, अशी माहिती माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे. नगराध्यक्षा राणीताई माने यांनी आपल्या कार्यकालात सांगोला शहरांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली. शहराच्या विकासासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस असा विकास निधी दिला. रस्ते ,लाईट, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, नळ कनेक्शनधारकांना मीटर देण्यात आले ,तसेच, सांगोला नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1755 अर्जदारांनी, घरकुलासाठी नगरपालिकेकडे अर्ज केले होते. त्यापैकी जानेवारी 2024 अखेर 306 घरकुलांना मंजुरी देण्यात आले होती. त्यापैकी सुमारे 200 घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत. तर 55 घरकुलांचे काम प्रगतीपथावर होते. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 1 लाख 50 हजार रुपये व राज्य शासनाकडून 1 लाख रुपये असे एकूण 2लाख 50 हजार रुपयांचे अनुदान मिळत असून ते नगरपालिकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. सांगोला शहरातील कचरा व्यवस्थापन, स्वच्छता ,आरोग्य, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास करण्यासाठी राणीताई माने यांनी आपल्या कार्यकाळात मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे शहरातील विकासाच्या अनेक प्रश्न व योजना पूर्ण करण्यात नगराध्यक्षांना यश आले.
प्राप्त निधीच्या 15% निधी नगराध्यक्षाना खर्च करण्याचा अधिकार सरकारने दिला होता .या 15 टक्के निधीतून शहरातील रस्ते , पेव्हिंग ब्लॉक, गटारी, सी डी वर्क, विद्युत पुरवठा, साफसफाई यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी खर्च करून शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पाळत विकास कामे मार्गी लावली. या सर्वांचा परिणाम म्हणून महायुतीकडून खासदारकीची निवडणूक लढवणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळत आहे. सांगोला शहरातून खासदार राजसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस असे4 हजारांचे लीड मिळेल अशी माहिती नगराध्यक्षा राणीताई माननीय ने दिली आहे .सांगोला शहरातून माजी नगरसेवक महायुतीचे गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी सांगोला शहरात आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व मित्र परिवारांची टीम तयार करून शहरातून होम टू होम प्रचार करून प्रत्येक मतदारापर्यंत आपले विचार व , महायुतीच्या शासनाने केलेली विकास कामे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या अनेक विकास योजना व त्यातून झालेला जनतेचा फायदा याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व मतदारांपर्यंत पोहोचवून मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठी असलेले योगदान व त्यांनी केलेली विकास कामे याची माहिती देण्यात आली. त्यामुळे सांगोला शहरातील जनतेने महायुतीच्या स्टार प्रचारक मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,आनंदाभाऊ माने, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळणार आहे.