उत्कर्ष विद्यालयतील विद्यार्थ्यांचे बंगळूर येथे विज्ञान प्रशिक्षण संपन्न; महाराष्ट्रातून फक्त उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड.

सांगोला- शहरातील उत्कर्ष विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची बंगळूर येथील कुप्पम अग्स्य विज्ञान केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली होती.सेवा इंटरनॅशनल दिल्ली या संस्थेने प्रशिक्षणासाठी लेखी परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत विद्यालयातील सिद्धी दिवटे,रेणुका दिवटे,पियुषा साळुंखे,अक्षरा जाधव ,आदित्य खटकाळे,श्रेयश गायकवाड या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती.या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंगळूर येथे नुकतेच संपन्न झाले.
या प्रशिक्षण केंद्रात मुलाना सकाळी प्रार्थना,योग,प्राणायाम घेतल्या नंतर दिवसभरात काय काम करावयाचे आहे,त्याची रुपरेषा दिली जात असे.त्यानूसार विद्यर्थ्याना ग्रुप करुन वेगवगळ्या प्रयोग शाळेत अध्ययनासाठी पाठवण्यात येत असे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विषयानुसार संकल्पना स्पष्ट करुन विविध प्रकल्प दाखवून त्यांची माहिती दिली जात असे.काही प्रकल्प विद्यार्थ्या कडून करुन घेवुन त्यांचे सादरीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांना एकत्र करुन सामुदायिक चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलके करण्याची व सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रकल्प एकत्र मांडून त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे व परीक्षकानी विचारलेल्या प्रश्नाना विद्यार्थ्यांनी अचुक उत्तरे देवून त्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके प्राप्त केली.या प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेश,तामिळनाडू, केरळ,पान्देचरि येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्याकडून वृक्षारोपण करण्यात आले.या प्रशिक्षणासाठी उत्कर्ष विद्यालयातुन मंगेश कुलकर्णी व रेश्मा कडव मैडम सहभागी झाले होते.
संस्था अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर,कोषाध्यक्षा डॉ.शालिनी कुलकर्णी,सचिव निलिमा कुलकर्णी,प्राचार्य सुनील कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले होते,ही सान्गोल्याच्या शै.क्षेत्रातील भूषणावह बाब असल्याचे प्राचार्य कुलकर्णी यानी नमुद केले.