कडलास येथे आढळला तरस; सांगोला वनविभागाने पकडून निसर्गाच्या सानिध्यात केले मुक्त
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील कडलास येथे 18 मे रोजी तरस हा वन्यप्राणी आढळला. या वन्यप्राण्यास सांगोला वनविभागाने पकडून कटफळ येथील वनक्षेत्रातील निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम जाधवर यांनी दिली.
कडलास येथून दि. 18.05.2024 रोजी सकाळी 9 वा. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले की, कडलास येथील माने वस्तीवर वन्यप्राणी तरस आलेला आहे. ताबडतोब कडलास येथे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर, वनपाल श्री.एस.एल. मुंढे, वनरक्षक श्री.जी.बी. व्हरकटे, हंगामी वाहन चालक श्री. संकेत बाबर तसेच वनमजूर श्री.देवकते, सरगर व बोराडे यांनी शासकिय गाडीत लोखंडी पिंजरा घेवून कडलास येथे गेले. लोकांचा जमाव जास्त होता. जमावास शांत करून जाळीच्या सहाय्याने तरस वन्यप्राण्यास पकडून लोखंडी पिंजर्यामध्ये ठेवुन पंचनामा केला. कोणत्या ही प्रकारची जखम त्यास नव्हती. गावातील ग्रामस्थ, वस्तीवरील घाबरले होते. सदर वन्यप्राणी तरस कटफळ वनक्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात वनअधिकारी सांगोला यांनी शासकिय गाडीतून सोडला आहे. कडलास येथे वनविभागाचे वनक्षेत्र नसल्यामुळे कटफळ येथील वनक्षेत्रात सोडले आहे.
कोणत्या ही वन्यप्राण्यांची शिकार करण्यास बंदी आहे. एखाद्या व्यक्तीने वन्यप्राण्याची शिकार केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या कायद्यानुसार त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते. त्यामुळे कोणत्या ही वन्यप्राणीची शिकार करु नये.
लोकांना आव्हान करण्यात येते की, वन्यप्राणी तरस, लांडगा, कोल्हा, ससा, काळविट, हरिण व इतर वन्यप्राणी एखाद्या गावात किंवा वस्तीवर जर आले तर त्यास कोणत्या प्रकारचा त्रास न देता ताबडतोब वनविभाग सांगोला यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल नं. 9420378279 , 9552474245,9767344883, 9021909550, 7499328831 यांच्याशी संपर्क साधावा.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे संरक्षण करणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सदर वन्यप्राणी तरस एक पकडून कटफळ वनक्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. याबाबत मार्गदर्शन मा. मुख्य वनसंरक्षक पुणे श्री.एन.आर. प्रविण, मा. उपनवसंरक्षक सोलापूर श्री. धैर्यशील पाटील, मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री.बी.जी. हाके यांचे मार्गदर्शन घेतले.