महाराष्ट्र

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

दि. 20 : सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सिध्देवश्वर प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
              सदर परिक्षेसाठी दि.15 मे 2024 पासून ऑनलाईलन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत . ज्या परिक्षार्थिंना तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन प्रवेशपपत्र मिळू शकले नाही व ज्या परिक्षार्थीचा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचेकडून प्राप्त हजेरीपटामध्ये समावेश आहे त्यांना परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल. अशा परिक्षार्थींनी स्वत:चा फोटो, ओळखपत्रासाठी आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड इत्यादी  सोबत आणणे आवश्यक असल्याचे  जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था) तथा जी.डी.सी. ॲन्ड ए परिक्षा केंद्र प्रमुख किरण गायकवाड यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!