सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश; ९० % पेक्षा जास्त गुण मिळविणारे ४ विद्यार्थी तर ६४ विद्यार्थांना विशेष प्राविण्य
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे बोर्डाकडून फेब्रु/मार्च,२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल काल मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी आँनलाईन जाहीर झाला.सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील इ.१२ वी शास्त्र, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये ज्युनिअर कॉलेज शास्त्र शाखा ९८.३४%, वाणिज्य शाखा १०० % तर कला शाखेचा निकाल ९३.६८% व ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९७.८७ % लागला आहे.
यामध्ये शास्त्र शाखा तनुजा ढोले ९३.१७% प्रथम क्रमांक,आदिती गायकवाड ९२.८३% द्वितीय क्रमांक, भक्ती घाडगे ९०.३३ तृतीय क्रमांक,वाणिज्य शाखा श्रेया दिघे ९०.५० % प्रथम क्रमांक,जुबिया शेख ८८.५०% द्वितीय क्रमांक,अनुष्का मिसाळ ८७.८३% तृतीय क्रमांक , कला शाखा प्रणाली होवाळ ८४.८३% प्रथम क्रमांक, आदित्य भस्मे ८०.६७% द्वितीय क्रमांक तर सना बागवान ७८.६७ % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म. शं. घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*चौकट* – सदर निकाल जाहीर झाल्यानंतर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते व सचिव म.शं घोंगडे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने यांचे हस्ते व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यार्थी हेच शिल्पकार आहेत असे सांगत स्थापनेपासून विद्यामंदिरची गुणवत्ता कायम राखत यावर्षी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सत्काराबद्दल पालकांनी संस्था, शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.