sangolamaharashtra

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा विद्यामंदिर मध्ये 212 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष,लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल व सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा विद्यामंदिर मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 212 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

सकाळी आठ वाजता सेवानिवृत्त शिक्षक धोंडीराम आदाटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी सरगर,नाझरे गावचे सरपंच संजय सरगर,उपसरपंच मधुकर आलदर,प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,माजी सरपंच हनुमंत सरगर,बलवडी गावचे सरपंच माऊली राऊत,उपसरपंच समाधान शिंदे,सोमनाथ कारंडे,चिनके गावचे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मिसाळ, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य संतोष मिसाळ,नाझरे गावचे उपसरपंच शशिकांत पाटील,मोहन मिसाळ, वझरे येथील सरपंच संजय कोकरे,ग्रामपंचायत सदस्य सुनील अडसूळ,माजी प्राचार्य के वाय पाटील, हणमंत बनसोडे,युवक नेते अजय सरगर,उल्हास धायगुडे, माजी सरपंच पिंटू बंडगर,चोपडी गावचे उपसरपंच पोपट यादव,प्रणाम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डोंगरे, नवनाथ डोंगरे, राजू मेखले व मित्रपरिवार,युवा नेते योगेश देवकुळे,सेवानिवृत्त शिक्षक कोंडीबा वाघमारे,माजी सरपंच सुनील कांबळे,जीवन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले,रक्तदात्यांचे हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदाते व मान्यवरांचे हस्ते रक्तदान शिबिराचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

 

या रक्तदान शिबिरास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य श्रीकांत लांडगे,पर्यवेक्षक रफिक मनेरी,रेवनील ब्लड बँकेचे प्रमुख सोमेश यावलकर,श्रीकांत पाटील आदी मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले. सदर शिबिरात नाझरे व परिसरातील सर्व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थ,चोपडी,बलवडी वझरे चिनके, उदनवाडी,कारंडेवाडी,अनकढाळ, लोटेवाडी आदी परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.प्राचार्य अमोल गायकवाड यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत शिबिराची सांगता केली. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!