नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य व शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Image-2024-05-21-at-5.31.53-PM-780x470.jpeg)
नाझरा(वार्ताहर):- फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या कला,वाणिज्य व शास्त्रच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
वाणिज्य व शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 94.44% लागला आहे. कला शाखेमधून कुमारी शेळके सानिका संतोष 89.17% गुण मिळवून प्रथम, द्वितीय केंगार तेजस्विनी नामदेव 79.50% तर तृतीय आलदर अनुराधा साधू 74.67%,वाणिज्य शाखेमधून कुमारी गायकवाड साक्षी चंद्रकांत 85% गुण मिळवून प्रथम,जुंधळे विजयकुमार बसवेश्वर 82.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर शितोळे पल्लवी सिताराम 71.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. शास्त्र शाखेमधून कुमारी मिसाळ तेजस्विनी श्रीमंत 78.67% गुण मिळवून प्रथम, धायगुडे स्नेहा सुधाकर 78.00 टक्के गुण मिळवून द्वितीय तर शेळके महादेवी अशोक 77.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.ज्युनिअर कॉलेजमधून 114 विद्यार्थी बारावीच्या परीक्षा साठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्यासह 6 विद्यार्थी , प्रथम श्रेणीमध्ये 71 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील, प्रा. प्रकाश म्हमाने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.