जुजारपूर परिसराला वादळी वाऱ्याचा पावसाचा तडाखा…घरावरील पत्रे उडाले शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2024/05/IMG_२०२४०५२२_१७३८४५-780x470.jpg)
सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे परिसरात मंगळवारी जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पावसामुळे अनेकांच्या घरावरून पत्रे उडून गेले जनावराच्या गाईचा गोठा कोसळला अचानक घडलेल्या प्रसंगामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये दगडू हरीबा खडके यांचे राहत्या घरावरील घरांचे पत्रे उडून गेले घराजवळच्या विटा घरामध्ये पडून सोपासेट तिजोरी फुटली जीवित हानी झाली नाही मात्र घरांचे नुकसान मोठे झाले आहे तसेच वादळी वाऱ्यामुळे जुजारपुर गावात तुकाराम विठ्ठल पाटील यांचे गाईचा गोठा पडला आहे.एक जर्सी गाई गंभीर जखमी झाली आहे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ब्रम्हंनाथ देवस्थान बाजीराव पाटील मळा जुजारपुर येथील सौर उर्जेवर असणारा हायमास्ट ची वादळी वाऱ्याने खाली पडून नुकसान झाले. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली परिसरातील अनेक शेतकरी यांच्या शिवारातील डाळिंबाची शेतीचे नुकसान होऊन. पडले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.घटनास्थळी पंचायत समिती सदस्य नारायण तात्या पाटील पत्रकार जगदीश कुलकर्णी जुजारपूर गावचे उपसरपंच पवन गाडे व पोलीस पाटील सदाशिव कारंडे यांनी घटनेची माहिती प्रशासनाला कळवली आहे.
![Simply Easy Learning](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2024/07/Add-a-heading.jpg)