सांगोला तालुकामहाराष्ट्र

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त १०३१ रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला (प्रतिनिधी)रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, लायन्स क्लब माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये २० मे २०२४ रोजी कोळे, २१ मे नाझरा,२२ मे लोणविरे, २३ मे रोजी सांगोला  या ठिकाणी एकूण १०३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.
 सांगोला येथील शिबिराच्या सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांचे हस्ते व प्रशासकीय अधिकारी  यांचे उपस्थितीत समर्पित करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड,ज्येष्ठ विधिज्ञ ॲड उदयबापू घोंगडे, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सांगोला लायन्स क्लबचे संचालक सुहास होनराव, कॅबिनेट ऑफिसर उत्तम बनकर  यांचे हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून झाले. यावेळी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य ॲड.विजयसिंह चव्हाण, चंद्रशेखर अंकलगी, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, संचालक विलास क्षीरसागर,सचिव अजिंक्य झपके, खजिनदार नरेंद्र होनराव, विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिराला  महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना प्रदेशाध्यक्ष  बाबासाहेब देशमुख,भा.ज.पा.जिल्हा अध्यक्ष चेतनससिंह केदार- सावंत यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले
या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला, सिद्धेश्वर ब्लड बैंक सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य गंगाधर घोंगडे  यांनी केले. सूत्रसंचालन लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पोपट केदार  यांनी केले. तर समारोप कार्यक्रमामध्ये रेवनील बँकेचे व्यवस्थापक सोमेश यावलकर व सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूरचे अजय जाधव व शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदाते उपलब्ध करून  रक्तदान केल्याबद्दल राजेंद्र ढोले, प्रा. नवनाथ बंडगर व प्रा. मोहन भोसले यांचा संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांचे  हस्ते सन्मान करण्यात आला. व शेवटी सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांनी विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लबच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले.
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या आचारविचारामागील तेज, तत्व,व कार्यावर, लोकांचे अपार प्रेम असल्यामुळेच २३ मे त्यांचे वाढदिवसानिमित दरवर्षी शेकडो रक्तदाते रक्तदान करतात. यावर्षी कोळे  १५१, नाझरा २१२,लोणविरे ८० व सांगोला येथे ५८८ असे एकूण १०३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे कार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!