चांडोलेवाडी व वाड्यांवर पाण्याचे टँकर चालू करा ; नागरिकांची मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला:-सांगोला शहरातील चांडोलेवाडी व परिसरातील वाड्यांवर पाण्याचे टँकर सुरू करा अशी मागणी चांडोलेवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
चालू वर्षी पाऊस फार कमी प्रमाणात झाल्याने विहिरी व बोअर कोरडे पडले आहेत तसेच सर्व वाड्या वस्त्या या नगरपरिषद हद्दीत येत असून याठिकाणी अद्यापही नळाची सोय नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात भासत आहेत व पशुंचेही हाल पाण्याविना होत आहेत.
तरी लवकरात लवकर टँकर सुरू करावेत अशी मागणी तरी चांडोलीवाडी परिसरातील सावंत वस्ती, गुसाळे वस्ती, इंगोली वस्ती , घाडगे वस्ती, शेंबडे वस्ती, सरगरवस्ती, चव्हाणवस्ती, मेटकरी वस्ती येथील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे.
निवेदनावर उमेश चांडोले, काशिलिंग सरगर. सिद्धेश्वर शेंबडे . शंकर मेटकरी संतोष श्रीराम,प्रभाकर सरगर, संतोष मेटकरी, दत्तात्रय भोसले, शहाजी सावंत, बंडू जावळे, बाळासाहेब चव्हाण, सचिन इंगोले , रामभाऊ घाडगे, शिवाजी सरगर, सोहेल मुजावर, सागर चांडोले, उत्तम सरगर, शिवाजी गुसाळे, वसंत गुसाळे, गोरख केदार, शिवाजी मेटकरी, महादेव कोळेकर, शरद श्रीराम, विलास शेंबडे, रमेश शेंबडे, संतोष शेंबडे यांच्या स्वाक्षरी आहेत.