माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे कौशल्य विकसन केंद्रात बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्गाचा प्रात्यक्षिक दिन साजरा

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर बालवाडी प्रशिक्षिका प्रशिक्षण वर्गाचा शुभेच्छा समारंभ दिनांक 24 मे 2024 शुक्रवार रोजी पार पडला गेले सहा महिने हा वर्ग सुरू होता या वर्गातील मुलींना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. शालिनी कुलकर्णी, सुमन कांबळे, संजीवनी भोसेकर या उपस्थित होत्या
प्रारंभी प्रतिमा पूजन व स्वागत करण्यात आले राधिका कुचेकर या वर्गाच्या मुलाने अच्युतमं केशवमं ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर रोहिणी लोखंडे ,स्मिता लेंडवे, पूजा तेली ,करिष्मा काझी, आदिती जवळेकर यांनी नाटक सादर केले यामधून त्यांनी स्वच्छ व सुंदर भारत कसा घडवायचा असा संदेश दिला दुसरे नाटक सादर करण्यात आले तो आगळावेगळा नाटकाचा प्रकार म्हणजे मुक अभिनय प्रणाली चव्हाण, करुणा माने, संध्या साळवी, अश्विनी लेंडवे,शिल्पा लवटे यांनी आपल्या मूकनाट्यातून सर्वधर्मसमभाव दाखवून देऊन तिरंग्याचे महत्व पटवून दिले.
यावरच आधारित देशभक्तीपर गीत ए मेरे वतन के लोगो हे गीत वैष्णवी साखरे आणि सुंदर आवाजात गाईले. मागील बॅचच्या मुलींचा प्रशस्तीपत्रक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वर्गातील धनवर्षा दीक्षित शिल्पा लवटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांचे कौतुक केले. वर्गाच्या शिक्षिका म्हणून धनश्री सोनंदकर यांनी आपला संसार बघून महिला बाहेर पडून उंच भरारी घेतात तसेच तुम्हीही करा असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. शालिनी कुलकर्णी यांनी मुलींना नोकरी जरी नाही मिळाली तरी डगमगायचे नाही आपल्या मुलांच्या मधूनच विकास करायचा हा लाखमोलाचा संदेश दिला व पुढील वाटचालयासाठी शुभेच्छा दिल्या. मा. संजीवनी भोसेकर बाईंनी चिन्हांची माहिती समजून सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .सुमनताई कांबळे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुलींना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मधुरा शास्त्री यांनी केले. या वर्गाला सुनीता कुलकर्णी, स्वप्ना कुलकर्णी, शालन गयाळी, धनश्री सोनंदकर, विद्या म्हेत्रे या शिक्षिका म्हणून लाभल्या तर शालिनी कुलकर्णी, सुशीला नांगरे, सुधामती लोंढे ,संजीवनी भोसेकर ,विजया खडतरे ,मंगल लाटणे या मार्गदर्शन करणाऱ्या माजी शिक्षिका म्हणून लाभल्या. या कार्यक्रमाचे आभार स्वप्न कुलकर्णी यांनी मांडले. सूत्रसंचालन किरण झाडबुके यांनी केले. तर प्रास्ताविक सुनीता कुलकर्णी यांनी केले.