तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणार्यांवर कडक कारवाई करावी; सांगोला येथील बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी

सांगोला:-इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार सांगोला यांना निवेदन दिले.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
सदर निवेदन देतेवेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, अॅड.सोमनाथ ऐवळे, रघुनाथ ऐवळे, चंचल बनसोडे, शिवाजी इंगोले, लक्ष्मणराव घनसरवाड, परमेश्वर गेजगे, संजय घाडगे, भागवत खरात, अयाज नदाफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करनु घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.