न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..
एस.एस. सी. परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2024 चा निकाल काल दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आला. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चा एकूण शेकडा निकाल 92.11% लागला.
प्रशालेतील एकूण 203 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून न्यू इंग्लिश स्कूल ने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत प्रशालेत कुमार सागर गणपत फुले 95% गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. द्वितीय क्रमांक विभागून कुमारी अतिथी सिताराम चव्हाण 94.60% व कुमार धनराज मारूती ढाळे 94.60% तृतीय क्रमांक कुमारी मंजुषा बापूसाहेब केदार 94% असे गुण मिळवले आहेत. 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी संख्या 9 तर 80% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी संख्या 20 तसेच विशेष श्रेणी मधील विद्यार्थी 46 प्रथम श्रेणीमधील विद्यार्थी 63 द्वितीय श्रेणीमधील विद्यार्थी 57 तर पास श्रेणीमधील 21 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य नामदेव कोळेकर, उपप्राचार्य केशव माने सर, पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,पर्यवेक्षक दशरथ जाधव, पर्यवेक्षक प्रा.संजय शिंगाडे संस्था अध्यक्ष,संस्था सचिव व सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.