रमाई स्मृतिदिनानिमित्त बेरोजगार मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट प्रथम एज्युकेशनच; वाणीचिंचाळे येथे फूड अँड ब्रेवरीज हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वाणी चिंचाळे:- वाणीचिंचाळे येथे रमाई स्मृती दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने फूड अँड ब्रेवरीज हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले.
यावेळी राज्य समन्वयक सुधाकर भदरगे यांच्या उपस्थितीत तसेच बापूसाहेब ठोकळे, तालुका संघटक किशोर बनसोडे, अस्तित्व सामाजिक संघटनेचे शहाजी गडहिरे सर, चिदानंद स्वामी, विद्यमान सरपंच गडहिरे मॅडम तसेच अॅड.सोमनाथ ऐवळे, विकास गडहिरे, पत्रकार सचिन गडहिरे मुख्याध्यापक शिक्षक जितेंद्र गडहिरे, सुशीला खरात उपस्थित होते.
राज्य समन्वयक सुधाकर सर बोलताना म्हणाले देशभरात एका वर्षात कम्युनिटी बेस 30000 तर सेंटरच्या माध्यमातून 30000 असे 60 हजार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण निर्माण करणार अशी घोषणाच करण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चा उद्देशच आहे त्याकरिता गावागावातून अनेक प्रतिष्ठित व विविध संघटना पक्ष नेते पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय अपुरी आहे त्यातल्या त्यात रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणारी कौशल्य ही निर्माण करण्यावर भर देणारी संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे नाममात्र अर्थात मोफत प्रशिक्षण देऊन कौशल्यावर आधारित समृद्ध देश घडवणे हाही उद्देश सफल होत आहे.
किशोर बनसोडे म्हणाले, जलप्रपात भारतात पाण्याचा मोठा लोंढा हा माणसाला बुडवण्यासाठी नाही तर त्याला पोहायला शिकवण्यासाठी येत असतो अशी भूमिका घेऊन आपलं ज्ञान आत्मसात करा आणि आयुष्य मंगलमय करा असे आवाहन केले. युवक नेते शहाजी गडहिरे यांनी समारोप केला