सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरू

*सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरू*

नगरपरिषद हद्दीतील नवीन बांधकाम केलेल्या मालमत्तांची नोंद नसल्याने नगरपरिषदेला कर उत्पन्नाला मुकावे लागत आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १२४ प्रमाणे सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नोंद नसलेल्या मालमत्तांची कर आकारणी करण्यासाठी पुरवणी कर आकारणीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सदर कामकाज पूर्ण करण्याकरीता एकूण ३ पथके तयार करण्यात आली आहेत. तरी पुरवणी कर आकारणीकामी मालमत्तांचे मोजमाप घेण्यासाठी आलेल्या पथकांना सहकार्य करावे, त्याचप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे मालकी हक्क कागदपत्र (७/१२ किंवा सिटी सर्व्हे उतारा), लाईट बिल झेरॉक्स, बांधकाम परवाना, वापर परवाना इ. कागदपत्रे सदर पथकाकडे जमा करावीत अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १५० क अन्वये पूर्वलक्षी प्रभावाने तसेच कलम १८९ अ अन्वये अनाधिकृत बांधकाम म्हणून सदर मालमत्तेची नोंद घेण्यात येईल असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button