“अस्तित्व”संस्थेच्या वतीने भटके- विमुक्त कुटुंबातील महिलांना शेळ्यांचे वाटप.
गोट बँक उपक्रम् गरीब महिलांना दिलासा देणारा - शहाजी गडहिरे

अस्तित्व संस्थेच्या वतीने भटके विमुक्त कुटुंबातील महीलाना मंगळवार दिनांक २८ मे रोजी ग्राम पंचायत सभागृह वाणी चिंचाळे येथे मान्यवरांच्या हस्ते शेळ्यांचे वाटप कऱण्यात आले.
कोविड नंतरच्या काळात अस्तित्व च्या वतीने विधवा व एकल महिला तसेच भूमिहीन कुटुंबांना आधार देण्याचे काम निरंतर सूरू आहे.ग्रामीण भागांतील एकल महिलांसाठी गेल्या दोन वर्षापासून गोट बँक हा उपक्रम सूरू असुन या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले असुन एका शेळीपासून आतापर्यंत तीन चार-शेळ्या झाल्या आहेत् .
शेळी व्यवसाय हा घर बसल्या बसल्या करता येणारा व्यवसाय असून मजूरी करणाऱ्या महिलांना मजुरीला जातांना सोबत घेउन जाता येणारा व्यवसाय असल्याने या व्यवसायाकडे महिलांचे आकर्षण असते.ग्रामीण भागांत शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते.म्हणून आम्ही गोट बँक सूरू करून ग्रामीण भागांतील एकल विधवा तसेच भटक्या विमुक्त कुटुंबातील पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक महिलांना जगण्याचे बळ दिले आहे या प्रश्नांवर मात करण्यासाठी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून विधवा व एकल महिलांना दिलासा देण्याचे कार्य निरंतर पणे चालू आहे. अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गरीब,वंचित समूहातील घटकांना मदत करून त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. आज अनेक महिला या व्यवसायात गुंतल्या असुन चांगले उत्पन्न मिळवीत आहेत्.
दि. 28 मे 2024 रोजी वाणी- चींचाळे ग्रामपंचायत सभागृहात भटके विमुक्त कुटूंबातील पाच महिलाना मान्यवरांच्या हस्ते शेळ्यांचे वाटप करण्यात आले त्यामधे ताई दत्ता मरीआईवाले, बाई भिमा मरीआईवाले, गंगुबाई श्रीपती मरीआईवाले, ललिता समाधान मरीआईवाले व सुमन आण्णा मरीआईवाले या महिलांचा समावेश आहे.
शेळी वाटप कार्यक्रमासाठी वाणी-चींचाळे गावचे सरपंच प्रतिनिधी मा. जितेंद्र गडहिरे, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गडहिरे, पत्रकार सचिन गडहिरे,गुणवंत गडहिरे, बसवंत स्वामी, शिवाजी गडहिरे, प्रफुल्ल उत्तम गडहिरे, ग्रामपंचायत चे प्रफुल्ल विलास गडहिरे तसेच अस्तित्व चे सागर लवटे, सुप्रिया जाधव ग्रामसेवक तसेच वाणी- चींचाळे गावातील प्रतिष्ठित नागरिक,उपस्थित होते. शेळ्या मिळाल्याबद्दल महिलांनी संस्थेचे आभार मानले. उपस्थितांचे आभार जितेंद्र गडहिरे यांनी मानले.