नाझरे येथील रंगनाथ हरिहर यांचे निधन

नाझरे ता सांगोला येथील रंगनाथ ज्ञानेश्वर हरिहर यांचे बुधवार 31 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष साठ होते.
हरिहर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. एक कष्टाळू, गरीब, होतकरू कारागीर गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता नाझरे येथे होईल अशी असे नातेवाईकांनी सांगितले.



