महाराष्ट्र
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कार्यक्रम

महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ‘पुस्तक परीक्षण’ या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
वाचन संस्कृतीमुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण प्रगती होते सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ हे उत्तम साधन आहे. पुस्तकासारखा मित्र नाही. वाचनाने मनुष्य समृद्ध होतो. ग्रंथांना गुरुचे स्थान दिले आहे. परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून अलिप्त होत असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने कॉलेजमध्ये उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.’पुस्तक परीक्षण’ उपक्रमामधील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, ग्रंथपाल श्री. दिगांबर मिसाळ, श्री. निलेश धावरे, डॉ. योगेश राऊत, डॉ. सविता सोनावणे आदी उपस्थित होते.