नरेंद्रनगर येथे चोरी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम नेली चोरुन
र्सांगोला(प्रतिनिधी):-अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन कडी कोयडा उचकटुन घरात प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटामधून सोन्याचे दागिने व रोख चोरून नेली असल्याची घटना सांगोला शहरातील नरेंद्र नगर येथे घडली. चोरीची फिर्याद विनय कांबळे, रा.नरेंद्र नगर यांनी दिली आहे.
तसेच फिर्यादी यांच्या घरापासुन थोड्या अंतरावर राहणारे मुरलीधर चवरे, संजय पवार यांचेही घरी अशाच प्रकारे चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ देवकर हे करीत आहेत.



